पंजाबात शेतकऱ्यांचा ‘रेल रोको’, 38 ट्रेन रद्द, 85 हजार प्रवाशांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अमृतसर

पूर्ण कर्जमाफी देण्याबरोबरच शेतजमिनींचा लिलाव आणि त्यांचे अटकसत्र रोखण्याची मागणी करीत पंजाबातील शेतकरी आज रेल्वे मार्गावर उतरले. त्यांच्या या आंदोलनामुळे 38 ट्रेन रद्द कराव्या लागल्या. तसेच दिल्ली-अमृतसर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अमृतसर-नवी दिल्ली एक्सप्रेस, अमृतसर-चंदीगड एक्सप्रेस, हरिद्वार-अमृतसर जनशताब्दी एक्सप्रेस, नवी दिल्ली – जालंधर सिटी इंटरसिटी एक्सप्रेस यासारख्या ट्रेन रद्द करण्यात आल्या. 11 ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले. तर 8 ट्रेनचा प्रवास अर्ध्यावरच समाप्त करण्यात आला.

  • या आंदोलनात पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, असे अमृतसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमाल सिंह यांनी सांगितले.
  • उसाच्या किमतीची रक्कम 15 टक्के व्याजासहित शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशीही मागणी पंजाबातील शेतकऱ्यांनी रेल रोको करून केली.
  • शेतकऱ्यांच्या आजच्या ‘रेल रोको’ आंदोलनाचा फटका 85 हजार प्रवाशांना बसला, असे पंजाबचे ऍटोर्नी जनरल अतुल नंदा यांनी न्यायालयाला सांगितले.