हिंदुस्थानात तीन ‘आयफोन 6’ बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानात अॅपल कंपनीच्या आयफोनची विक्री घटली आहे. आयफोनला मिळत असलेला कमी प्रतिसाद बघता अॅपल कंपनी आयफोन 6, आयफोन 6 एस, आणि आयफोन 6 प्लस या फोनची विक्री बंद करण्याची शक्यता आहे. आयफोन्सच्या काही मॉडेल्सची विक्री बंद करण्याबरोबरच कंपनी देशातील काही स्टोअर्स बंद करणार आहे.

ज्या स्टोअर्समधून एका महिन्यात 35 हून अधिक फोनची विक्री होत नाही, असे स्टोअर बंद होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी आयफोन 6, आयफोन 6 एस आणि आयफोन 6 प्लस या मोबाईलची हिंदुस्थानात सर्वाधिक विक्री व्हायची, आता मात्र ही विक्री मंदावली आहे. या फोनची विक्री बंद केल्यानंतर कंपनी प्रीमियम आयफोनवर लक्ष केंद्रीत करणार आहे. या प्रीमियर आयफोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांची वाढ होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.