शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुमसर शहरात शिवसेनेची भव्य बाईक रॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । तुमसर

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती मोठय़ा उत्साहात आणि थाटात साजरी करण्यात आली. शहरातून मोर भवन येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला तसेच तुमसर आगार बस स्थानक, सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय, नगरपरिषद तुमसर, तुमसर रोड रेल्वे स्थानक या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. या रॅलीमध्ये शिवसैनिकांनी भगवे झंडे हातात घेऊन ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देत आसमंत निनादून गेला होता तसेच शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी रॅली काढण्यात आली.

यामध्ये रॅलीमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, शहर प्रमुख नितीन सेलोकर, अमित एच. मेश्राम, उपशहर प्रमुख किशोर यादव, मोहनिश साठवणे, शेखर जांगळे, भूषण बुद्धे, तालुका प्रमुख प्रकाश लसुनते, नरेश उचिबगले, उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, युवासेना तालुका अधिकारी संजू डहाके, शहर अधिकारी प्रवीण गुप्ता, कामगार सेना तालुका अध्यक्ष मनोहर जांगळे, संजय झंझाड, ईश्वर भोयर, विनोद निमकर, भास्कर भोयर, लंकेश तिजारे, निखिल नागदेवे, महेंद्र मेश्राम, मनोज भोयर, सौरव पोटभरे, मनोज कांबळे, निखलेश गजभिये, नितेश पाटील, पिंकेश मोहतुरे, मिलिंद खवास, नितीन कडवं, निखिल गजभिये, कैलास रहांगडाले, राखीचंद रहांगडाले, शिवशंकर शेंद्रे, प्रशांत डोरले, महेश पाटील, यश कोलते, मनोज उके, बिरजू मेटे, अजय पंधरे, वामन पडोळे, रफिक शेख, नंदू बावनकर, राहुल बानासुरे, अनिल मोहणे सह शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

सदर सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ व बिस्कीट पॉकेटचे वितरण करण्यात आले तसेच सायंकाळी साडेसहापासून कस्तुरबा विद्यालय येथे नागरिकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.