राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सरकारी व अन्य पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 9 टक्क्यांहून 12 टक्के इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आज वित्त विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय जारी केला आहे. जानेवारी 2019पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 जुलै 2019पासून रोखीने देण्यात येईल तर 1 जानेवारी ते 30 जून 2019 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.