
सामना ऑनलाईन,मुंबई
गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन, तर अधूनमधून विचित्र वातावरणाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना आज मुसळधार पावसाने धक्का दिला. मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी दिवसभर पावसाने मुंबईसह आणि उपनगरात तुफान बॅटिंग केली. सायंकाळी पावसाचा जोर ओसरला.



























































