
ट्विटरने युजर्ससाठी भन्नाट फिचर बुधवारी लाँच केले आहे. कंपनीने व्हॉईस डायरेक्ट मॅसेज नावाचे फिचर आणले आहे. या फिचरद्वारे युजर्स स्वतŠचा आवाज रेका@र्ड करुन मॅसेज पाठवू शकतात. व्हॉईस ट्विटप्रमाणेच व्हॉईस मॅसेजमध्येही 140 सेकंदांची ऑडिओ नोट पाठवता येते. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी आहे.
ट्विटर अॅप अपडेट केल्यानंतर डायरेक्ट मॅसेजच्या बॉक्समध्ये व्हॉईस रेका@र्डिंगचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करुन मॅसेज रेका@र्ड करून सेंड करता येईल. मॅसेज पाठवण्याआधी तो युजर्सना ऐकण्याची देखील सुविधा आहे. हे फीचर सध्या हिंदुस्थान, जपान आणि ब्राझील या देशांमध्ये रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे.






























































