व्हेनिसचे कालवे कोरडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

सध्या व्हेनिसमधील कालव्यांतील पाणी इतकं कमी झालंय की, तिथले कालवे जवळपास कोरडे पडले आहेत आणि प्रसिध्द गोंडोला काठावरच्या चिखलात अडकून बसले आहेत. जरी काहीच महिन्यांपूर्वी या शहराला पुराने ग्रासलं होतं तरी आता मात्र फक्त 48 सेंटिमीटर खोल पाणी आहे, अविश्वसनीय अशा ओहोटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असा अंदाज आहे. तथापि या विरोधाभासाचा अभ्यास तज्ञ मंडळी करीत आहेत. त्यातून व्हेनिसचे कालवे कोरडे का पडले, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

गोष्ट 2002 सालची. व्हेनिसमध्ये मोठा पूर आला होता. त्यामुळे तेथील लोक खूपच हैराण झाले होते. कारण हे काही पहिल्यांदाच होत नव्हतं. म्हणून ब्रिटिश एक्सपर्टस्ची एक टीम बोलावण्यात आली होती. या दरवर्षी येणाऱया पुरापासून व्हेनिसला वाचविण्याचे प्रयत्न करण्यासाठी आणि पुराण वास्तूंना वादळी वाऱयापासून रोखण्यासाठी!

यासाठी एक योजना बनवण्यात आली, ज्यात थेम्स नदीला आहेत तसेच 79 पाणी अडवणारे दरवाजे, प्रत्येकी 300 टनांचे, बनवण्याचं ठरवलं गेलं. एकदा का ते तयार झाले की, व्हेनिस शहर गिळंकृत करायला येणाऱया भरतीच्या लाटा, दरवाजे उंच करून थांबवता येतील अशी व्यवस्था करण्याची योजना होती. यात भीती एवढीच होती की, याचा व्हेनिसच्या खाऱया पाण्याच्या सरोवरावर परिणाम झाला असता. दरवेळी ओहोटीबरोबर साफ होणारे कालवे पाणी पूर्णपणे बाहेर न गेल्याने जास्तच दुर्गंधीयुक्त झाले असते.

परिस्थिती हाताबाहेर न जाऊ देण्यासाठी व जागतिक तापमानवाढीमुळे पाणी वाढून व्हेनिसला बुडण्यापासून वाचवण्यासाठी या ब्रिटिश शास्त्र्ाज्ञांनी वेगवेगळे उपाय सुचवले. सेंट अॅन्ड्रय़ूज युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेव्हिड पॅटरसन यांनी हा तीन वर्षीय प्रकल्प 2002 च्या ऑगस्टमध्ये सुरू केला. याचा खर्च होता 2,50,000 पौंड आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाने व सॅटेलाईटने काढलेल्या पह्टोंच्या आधारे पाण्याची पातळी आणि पाण्यातील जिवंत प्राणी यांवर कायम लक्ष ठेवण्याची व्यवस्था केली गेली.

प्रोफेसर पॅटरसनच्या मते मुळात व्हेनिस बुडण्याचा प्रश्न, काही शतकांआधी इटलीची सर्वात मोठी ‘पो’ नदी शहरापासून दूर वळवली गेली हा आहे. त्यामागे हेतू हा होता की, नदीतला गाळ बंदरात वा कालव्यांमध्ये पोहोचू नये, पण त्यामुळे वेगळा प्रश्न निर्माण झाला. गाळ कालव्यांमध्ये येत होता तोपर्यंत वाळू आणि चिखल यावर ते शहर उभं होतं, परंतु जेव्हा यापैकी गाळातून येणारी वाळू बंद झाली तेव्हा हळूहळू व्हेनिस बुडू लागलं.

एरडल ओझान या टकोच्या एक्सपर्टच्या मते समुद्रातून नैसर्गिक गॅस काढण्यामुळे व पिण्याच्या पाण्यासाठी खणल्याने गेल्या 25 वर्षांत शहराची पातळी अर्धा मीटर पाण्याखाली गेली आहे. सगळ्यात वाईट पूर 1966 मध्ये आला होता, ज्यावेळी उत्तर आफ्रिकेतून दक्षिण युरोपकडे वाहणारा उष्ण धूळयुक्त जोरदार वारा व्हेनिसमधील पाणी एक मीटर उंच वाढवू शकतो आणि व्हेनिस सपाट असल्याने त्यामुळे शहरात पूरसदृश परिस्थिती येऊ शकते. इथल्या कालव्यांची खोली कमीत कमी 60 फूट आहे. म्हणूनच तर या शहराला ‘सिटी ऑफ वॉटर’ वा इथे 300 पूल असल्याने ‘सिटी ऑफ ब्रिजेस’ असं म्हणतात.

स्थानिक उद्योगांना गरज लागल्याने व्हेनिस शहराच्या आजूबाजूस असलेल्या कूपनलिकांमधून त्यांनी पाणी वापरायला सुरुवात केली. त्यावेळी व्हेनिसच्या कालव्यांमधील पाणी कमी होऊ लागलं आणि व्हेनिस बुडण्याचा वेग कमी झाला. 1960च्या दशकात कूपनलिकांवर बंदी घालण्यात आली. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्रपातळी वाढून काही शहरं पाण्याखाली जाणार असं दिसत असलं तरीही इतर जगाच्या मानाने व्हेनिस बुडण्याचा वेग जास्त आहे.

सध्या व्हेनिसमधील कालव्यांतील पाणी इतकं कमी झालंय की, तिथले कालवे जवळपास कोरडे पडले आहेत आणि प्रसिध्द गोंडोला काठावरच्या चिखलात अडकून बसले आहेत. जरी काहीच महिन्यांपूर्वी या शहराला पुराने ग्रासलं होतं तरी आता मात्र फक्त 48 सेंटिमीटर खोल पाणी आहे, अविश्वसनीय अशा ओहोटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असा अंदाज आहे. तथापि या विरोधाभासाचा अभ्यास तज्ञ मंडळी करीत आहेत. त्यातून व्हेनिसचे कालवे कोरडे का पडले, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

[email protected]