
नोटबंदीनंतर देशातील रिअल इस्टेमधील रोखीचे व्यवहारांमध्ये किमान 75 ते 80 टक्क्यांनी घट झाली आहे, असे रिअल इस्टेट सेवा कंपनी अॅनारॉकने अहवालात म्हटले आहे. नोटबंदी पूर्वीच्या म्हणजेच 2013 ते 2016 या कालावधीत अंदाजे 16.15 लाख गृहनिर्माण युनिट्स टॉप 7 शहरांमध्ये लाँच केले होते, तर विक्री अंदाजे 11.78 लाख युनिट्स इतकी होती. नोटबंदीनंतर म्हणजेच 2016 ते 2021 या कालावधीत 10.37 लाख युनिट्सच्या विक्रीने 9.04 लाख युनिट्सच्या नवीन लाँचला मागे टाकले. घरांच्या पुनर्विक्रीला नोटबंदीचा फटका बसला असताना विकासकांकडे परवडणाऱया आणि मध्यम विभागातील घरांची मागणी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.





























































