शंभर वर्षांच्या आपत्तीतही नवा विश्वास देणारे बजेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शंभर वर्षांच्या भीषण आपत्तीच्या काळात यंदाचा अर्थसंकल्प विकासाचा नवा विश्वास घेऊन आला आहे. सर्वांसाठी सर्वकाही अशा स्वरूपाचा यंदाचा अर्थसंकल्प असून सामान्यांसाठी यातून अनेक संधीची कवाडे खुली होणार आहेत. अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक वृद्धी, अधिक नोकऱया असा मोठा संकल्पच यातून करण्यात आला असून ‘ग्रीन जॉब’ या संकल्पनेला याद्वारे गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

गरीबांपर्यंत घर, नळ, गॅस आणि शौचालय यांसारख्या सुविधा पोहोचविण्याच्या कामाला अधिक गती मिळेल. लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठीही मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. गरीब, शेतकरी, तरुण वर्ग अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आल्याचे मोदी म्हणाले.