नितीश आणि मानसीची  सोयरीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्न हा कुटुंब व्यवस्थेचा कणा. लग्न ठरवण्याच्या, करण्याच्या आणि निभावण्याच्या ठरलेल्या पारंपरिक चौकटी मोडून आपल्या पसंतीला प्राधान्य देत लग्न जुळवण्याचा विचार करणारी आजची जनरेशन आहे. ‘लग्न हा विषय आमचा वैयक्तिक आहे’, असे नवी पिढी स्पष्टपणे म्हणू लागली आहे. यावर प्रभावी भाष्य करणारा मकरंद माने दिग्दर्शित ‘सोयरीक’ हा चित्रपट 11 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

नुकताच  चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘सोयरीक’ या चित्रपटात नितीश चव्हाण आणि मानसी भवाळकर ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, किशोर कदम, छाया कदम, उमेश जगताप, राजश्री निकम, शंतनू गंगणे, विराट मडके, प्रियदर्शनी इंदलकर, विनम्र भाबल आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. उत्तम संहिता, दर्जेदार अभिनय आणि वेगळी दिग्दर्शकीय शैली यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे.