
कांदिवली येथे अल्पवयीन मुलाने त्याच्या वडिलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. अजय शिर्के असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. बुधवारी दारूच्या नशेत असलेल्या अजयने पत्नी मीनाक्षीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तेथे अजयच्या मुलाने पाहिला. त्याने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात लोखंडी हाथोडी मारून त्यानंतर सुरीने वार केले. अजयच्या पत्नीने याची माहिती समतानगर पोलिसांना दिली. पोलिसांनी अजयला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



























































