तीन हजार वर्षांपूर्वीचे बूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॉर्वेमध्ये जगातील सर्वात प्राचीन बूट सापडले आहेत. हे बूट तीन हजार वर्षांपूर्वीचे आहेत. संशोधकांकडून हे बूट कांस्य युगातील असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मागील दोन दशकांत नॉर्वे येथील पहाडांवरील बर्फ वितळल्याने अनेक प्राचीन वस्तू सापडत आहेत. त्यामध्येच सर्वाधिक जुने बूट असल्याचे नॉर्वेतील सायन्स ऍण्ड टेलॉजी युनिक्हर्सिटीच्या अहवालात म्हटले आहे. बुटाजवळ काही बाण आणि कुदळी सापडली आहेत. त्यामुळे त्या काळात हा शिकारीचा भाग असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नॉर्वेमध्ये विशिष्ट प्रकारची माती आणि हिमनगाखाली दबलेल्या या वस्तू आजही सुस्थितीत आहेत. बर्फ वितळत असल्याने हत्यारे, कपडे, वनस्पतींचे अवशेष, प्राण्यांच्या अस्थी सापडत आहेत.