मुंबईच्या प्रतिक्षायादीतील 448 उमेदवारांना लोको पायलट भरतीत संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड भरतीत नेहमीच स्थानिक उमेदवारांना डावलून इतर राज्यांच्या उमेदवारांना संधी दिली जात असते. त्यामुळे मराठी उमेदवारांवर अन्याय होत असतो. अशाच प्रकारे मुंबईच्या पात्र वेटलिस्टवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या उमेदवारांना मुंबईत पोस्टींग दिल्याने संताप निर्माण झाला होता. याची दखल रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेत मुंबईच्या प्रतिक्षायादीतील 448 उमेदवारांना लोका पायलट भरतीच्या परीक्षेला बसता येणार आहे.

रेल्वेमध्ये सीईएन 01/2018 असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी मुंबईच्या पात्र वेटलिस्टवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या आरआरबीच्या उमेदवारांना मुंबईच्या आरआरबीच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली होती. यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील वेटलिस्टवर असलेल्या उमेदवारांची संधी हुकली होती. या बाबत रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी लक्ष घातले. तात्काळ रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी आदेश दिल्यामुळे मुंबईतील रिक्त जागांवर मुंबईच्या वेटलिस्ट उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. याविषयी नोटीफिकेशन काढले असून त्यामुळे मुंबईच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.

देशभरातील 7400 उमेदवारांनाही फायदा
रेल्वे बोर्डा कडून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत (आरआरबी) गरजेनुसार लोको पायलटची परिक्षा घेतली जाते. त्यानुसार मेन पॅनल व वेटींग लिस्टची नावे जाहिर करण्यात येतात. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लक्ष घातल्याने मुंबईच्या 448 उमेदवारांसहीत देशभरातील आरआरबीचे एकूण 7400 एएलपी वेटींग उमेदवारांचे नोकरीचे काम मार्गी लागले आहे. गेली अडीच वर्षे रखडलेले या उमेदवारांवर अन्याय झाला होता.