मंडीत लाखो बकरे; चोरी रोखण्यासाठी पोलिसांची फिल्डिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंडीत विकण्यासाठी आणले आहेत. मंडीतील गर्दीचा फायदा उचलत बकऱयांची चोरी होऊ नये यासाठी पोलिसांनी यंदा तगडी फिल्डिंग लावली आहे. 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार येथे नियमितपणे बकरा मंडी भरते. सालाबादप्रमाणे यंदाही लाखो बकरे विक्रीसाठी मंडीत आणण्यात आले आहेत. बकऱयांची चोरी होऊन व्यापाऱयांचे नुकसान होऊ नये यासाठी महानगरपालिकेबरोबरच देवनार पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. या वेळी बारकोड पद्धत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे किती बकरे मंडीत दाखल झाले आणि किती विक्री होऊन मंडीबाहेर गेले तसेच किती शिल्लक आहेत याची नोंद ठेवली जात आहे. व्यापाऱयांचा फोटो स्कँन करून व बारकोड देऊनच मंडीत प्रवेश दिला जात आहे. तसेच बकरा खरेदी करणाऱयाला खरेदी पावती आणि बारकोड बघूनच गेटबाहेर सोडले जात आहे. याचबरोबरीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण मंडीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बकरा चोरी किंवा व्यापाऱयांच्या किमती ऐवजांची चोरी होऊ नये याकरिता  गणवेशधारी तसेच साध्या वेशातील पोलिसांकडून गस्त केली जात आहे. यापूर्वी ज्यांना बकरी चोरीच्या गुह्यात पकडण्यात आले होते अशा चोरांवर पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली आहे. टॉवरवरून दुर्बिणीनेदेखील वॉच ठेवला जात आहे.

एकाने प्रयत्न केला; हाणून पाडला 

कडक सुरक्षा असतानाही एकाने बकरा चोरण्याचा प्रयत्न केला होता. पण देवनार पोलिसांनी तो हाणून पाडला. संबंधितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याव्यतिरिक्त कुठलाही अनुचित प्रकार मंडीत घडला नाही, असे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी सांगितले. 

अल्लाह लिहिलेला सात लाखांचा बकरा

वलसाड येथून शराफतअली गोरी या व्यापाऱयाने एक बोकड विक्रीसाठी आणला आहे. त्या बोकडाच्या पाठीवर अल्लाह असे उर्दू भाषेत लिहिले आहे. त्यामुळे या बोकडाची किंमत सात लाख असल्याचे शराफत अली यांनी सांगितले. मंडईतील  बहुतेक बकऱयांची विक्री झाली आहे.