तडीपारीच्या कारवाईनंतरही शहरात फिरणाऱ्या सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरासह जिल्ह्यातून तडीपार केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणार्‍या सराईताला गुन्हे शाखा यूनिट दोनच्या पथकाने अटक केली. कोंढव्यातील फकरिहील सोसायटी भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. आफताब उर्फ बडा पाडा राजु पठाण (23, रा. रॉयल सोसायटी, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरातून तडीपार केल्यानंतर अनेक गुन्हेगार शहरात वास्तव्य करतात. अशा गुन्हेगारांचा शोध घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. यानूसार गुन्हे शाखा यूनिट दोनचे पथक गस्तीवर असताना तडीपार आरोपी पठाण हा कोंढवा भागात थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून पठाणला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यूनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन कांबळे, अंमलदार शंकर नेवसे, मोहसीन शेख, निखील जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.