शेम टू शेम! भूमी पेडणेकरच्या बहिणीला पाहून चाहते गोंधळले, उज्जैनमधले फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर भूमी पेडणेकरने अल्पावधीतच सीनेसृष्टीत एक खास ओळख निर्माण केली आहे. दरम्यान भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. भूमी नुकतीच महाकालेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैनला गेली होती. दर्शनानंतर काढलेले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. ते फोटो भलतेचं व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌏 (@bhumipednekar)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकरच्या बाजूला एक व्यक्ती उभी आहे. जी हुबेहूब तिच्यासारखीच दिसते आहे. या फोटों नंतर सोशल मीडियावर लोक हे जाणण्यासाठी उत्सुक आहेत की नेमकं ही व्यक्ती कोण आहे? या फोटोंमध्ये अन्य कोणी नसून भूमी सोबत तिची बहीण समिक्षा पेडणेकर दिसत आहे. तिच्या बहिणीला पाहून चाहते भलतेच गोंधळले. भूमी पेडणेकरच्या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत की, तिची बहीण अगदी तिच्यासारखी दिसते.

कोण आहे समीक्षा पेडणेकर?

भूमी पेडणेकरच्या बहिणीचे नाव समिक्षा पेडणेकर आहे. समिक्षा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. समिक्षा मॉडेलिंगच्या जगात सक्रिय असून पेशाने वकीलही आहे. सोशल मीडियावर चाहते समिक्षाची बहीण भूमी पेडणेकरशी तुलना करताना दिसतात. यापूर्वी समिक्षाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. समिक्षा बॉलीवूड स्टार नाही, पण सोशल मीडिया स्टार नक्कीच आहे.