आंतरराष्ट्रीय विमानतळावर 16 कोटींचे हेरॉईन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तब्बल 16 कोटी किमतीचे हेरॉईन ड्रग्जसाठा जप्त केला. हा ड्रग्जसाठा घेऊन आलेल्या युगांडा देशाच्या ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबईत येणाऱ्या कैनियन एअरलाईन्सने एक महिला मोठय़ा प्रमाणात हेरॉईन ड्रग्जचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या एआययू पथकाला मिळाली होती. त्यानुसार विमानतळावर सापळा लावून एआययू पथकाने युगांडाच्या ड्रग्ज तस्कर महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडील सामानाची तपासणी केली असता पुठ्ठय़ाच्या बनवलेल्या बॉक्समध्ये दोन किलो पाच ग्रॅम वजनाचा हेरॉईन ड्रग्जचा साठा मिळून आला. त्या ड्रग्जची किंमत 16 कोटी असल्याचे सांगण्यात येते.