मे महिन्यात महाराष्ट्रात 8 दिवस बँका बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मे 2023 मध्ये देशभरातील बँका 12 दिवस बंद राहणार आहे. सण, जयंती इत्यादी कारणामुळे या सुट्टय़ा असतील. ज्यात रविवार, शनिवारच्या सुट्टय़ांच्याही समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टय़ा यादीनुसार 1 मे महाराष्ट्र् दिन, 5 मे बुद्ध पौर्णिमा, 7 मे रविवार, 13 मे दुसरा शनिवार, 14 मे रविवार, 27 मे चौथा शनिवार, 28 मे रविवार असे 8 दिवस महाराष्ट्रात मे महिन्यात बँका बंद राहणार आहेत.