
आपल्या पायाच्या शिरा कधी कधी आखडतात किंवा गुडघेदुखी अथवा वाताचा त्रास आपल्याला होतो. बाजारात अनेक प्रकारची औषधे मिळतात. मात्र वारंवार औषधे घेणे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. शिवाय खूप महागातली औषधे घेऊन देखील आपल्याला काही फरक जाणवत नाही गुडघेदुखीची समस्या ही आता आम समस्या बनली आहे. एक रामबाण उपाय काही दिवस करा व गुडघेदुखीची समस्या कायमची विसरुन जा. हा घरगुती उपाय आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन ते चार घटक लागतात. सर्व प्रथम आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे हळदीच्या पावडरची हळद एक उत्तम आयुर्वेदीक वेदनाशामक औषधी आहे. कापले असल्यास प्रथमोपचार म्हणून प्रत्येक हिंदुस्थानी घरात हळद लावली जाते. हळद ही दुखण्यावर देखील एक गुणकारी उपाय आहे. म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपण हळदीची पावडर वापरणार आहोत.
दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे गुळ. गुळामध्ये मानवाच्या शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक असतात. गुळाच्या रोजच्या सेवनाने शरीरातील सर्व थकवा व अशक्तपणा दूर होतो. म्हणूनच बाहेरून आल्यानंतर गुळ पाणी घेतात. या उपायासाठी आपणास काळा गुळ घ्यायचा आहे. काळ्या गुळामध्ये जीवनसत्वांची संख्या जास्त असते. म्हणून तुम्ही शक्यतो जुना झालेला काळा गूळ या उपायासाठी वापरा. तिसरा व शेवटचा घटक आपण या उपायासाठी वापरणार आहोत तो म्हणजे चुना. चुना हा अत्यंत गरम आहे व झिंक, लोह तसेच फोस्फेट या घटकांनी मुबलक प्रमाणात भरलेला आहे. चुना तुमच्या शरीरातील दुखणे थांबवण्यास मदत करेल. अनेक लोकांना माहित नाही मात्र चुना देखील एक निसर्गाच्या सानिध्यात तयार होणारा वेदनाशामक घटक आहे. म्हणूनच आपल्याला या उपायासाठी चुना देखील वापरायचा आहे. आता मोठे चमचे दोन हळदीची पावडर, चार ते पाच काळ्या गूळाचे छोटे तुकडे , दहा ते वीस ग्राम चुना या तीन्ही घटकांना योग्य पद्धतीने एकत्र करुन घ्या. या नंतर या मिश्रणात गरजेनुसार पाणी टाका. योग्य मिश्रण तयार झाल्यावर याला रोज रात्री एक आठवडाभर गुडघ्यांवर झोपण्याआधी लावा आणि फक्त आठवड्यानंतर जादू बघा. गुडघेदुखी संपूर्ण नाहीशी होईल तुम्ही देखील इतर लोकांप्रमाणे चालू फिरु आणि धावू शकता. होय हा उपाय आयुर्वेदातील एक अनमोल उपाय आहे




























































