
भोसरी-एमआयडीसी येथील भूखंड खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. ईडीने दोन वर्षांपूर्वी आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मंदाकिनी खडसे यांना दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला आहे.




























































