
साहित्य विश्वात अतिशय मानाचा समजला जाणारा ‘साहित्य अकादमी – 2023’ पुरस्कार आज जाहीर झाला. मराठी भाषेचा पुरस्कार लेखक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला घोषित झाला. एक लाख रुपये रोख आणि ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दिल्लीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव काwशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर 24 भाषांचे पुरस्कार घोषित करण्यात आले. यात 9 कवितासंग्रह, 6 कादंबऱया, 5 लघुकथा, 3 निबंध, एका साहित्यिक अभ्यास पुस्तकाचा समावेश आहे. यासाठी 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान प्रकाशित पुस्तकांचा विचार करण्यात आला. काsंकणीमध्ये डॉ. प्रकाश पर्येकर यांना ‘वर्सल’ कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला आहे. हिंदीतील साहित्य अकादमी पुरस्कार संजीव यांच्या ‘मुझे पाहानो’ या कादंबरीला, तर इंग्रजीसाठी नीलम शरण गौर यांना पुरस्कार मिळाला. नवी दिल्ली येथील कमानी ऑडिटोरियममध्ये 12 मार्च 2024 पुरस्कारांचे वितरण होईल.
कृष्णात खोत यांनी ‘रिंगाण’ कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे. रिंगाण ही कादंबरी 2018मध्ये प्रकाशित झाली होती. कृष्णात खोत यांच्या यापूर्वी ‘गावठाण’ (2005), ‘रौंदाळा’ (2008), ‘झड-झिंबड’ (2012), ‘धूळमाती’ (2014) कादंबऱया प्रकाशित झालेल्या आहेत. तर ‘नांगरल्यावीन भुई’ (2017) हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह प्रसिद्ध आहे.
विस्थापितांच्या आवाजाची नोंद ‘रिंगाण’ या कादंबरीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे देशपातळीवरचा एक साहित्यिक म्हणून ओळख झाली. शेसव्वाशे घरांच्या निकमवाडीसारख्या वाडीतून देशाच्या राजधानीत आपल्या लेखणीची नाममुद्रा उमटवणारा लेखक या पुरस्कारामुळे होता आलंय. जबाबदारीने लिहिणाऱयांनाच नव्हे, तर जबाबदारीने कोणतेही सर्जनशील काम करणाऱयांचा सन्मान होणे हे फक्त त्याच्याच नाही, तर समाजाच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते.






























































