
रूबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहआरोपी असलेल्या ससूनचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे याला न्यायालयाने 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोर्शे कार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. अजय तावरे याचा किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला प्रॉडक्शन वॉरंटने बुधवारी ताब्यात घेत आज न्यायालयात हजर करण्यात आले. रुग्णाच्या पत्नीच्या ऐवजी हजर राहिलेल्या महिलेच्या वयात तफावत होती. समितीच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तरीही तावरेच्या अध्यक्षतेखालील समितीने एकूण नऊ किडनी प्रत्यारोपणाला परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे याचा तपास करण्यासाठी तावरेला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील दिगंबर खोपडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.



























































