
गंगापूर लासूर – कानोरी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. अलीम पठाण (लासूर स्टेशन) आणि सूरज लकवाल (कानोरी) अशी त्या तरुणांची नावं आहेत.
गंगापूर लासूर – कानोरी रस्त्यावर आज संध्याकाळी सहा वाजता दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जखमी झाले. या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुढे गेलो. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांना माझ्या आपल्या गाडीतून तातडीने लासूर स्टेशन येथील हॉस्पिटलमध्ये रवाना केले.
या… pic.twitter.com/8ji5g8X8ZJ
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 9, 2025
त्याचवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची गाडी तिथूनच जात होती. त्यावेळी अंबादास दानवे गाडीतून उतरले व त्यांनी जखमी तरुणांना आपल्या गाडीने लासूर स्टेशनजवळील रुग्णालयात दाखल केले.