
राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतीदिन असूनही मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या तळमजल्यावरील तसबिरीला महायुती सरकारकडून साधा हारही घालण्यात आला नाही. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयातच झाली. मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य बैठकीला होते. मात्र सरकारमधील एकाही मंत्र्याला राजमाता जिजाऊ यांचे स्मरण झाले नाही.


























































