
यशस्वी जैस्वाल व कर्णधार शुभमन गिल यांनी शतके ठोकून ‘तेंडुलकर-अॅण्डरसन कसोटी क्रिकेट’ मालिकेतील सलामीच्या सामन्याचा पहिला दिवस गाजविला. त्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी मधल्या फळीतील स्पह्टक फलंदाज ऋषभ पंतने दणकेबाज शतक ठोकून हिंदुस्थानला 113 षटकांत 471 धावसंख्या उभारून देण्यात मोलाची भूमिका बजाविली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा प्रत्युत्तरादाखल यजमान इंग्लंडने 18 षटकांत 1 बाद 90 धावांपर्यंत मजल मारली होती. बेन डकेत 46, तर ओली पोप 39 धावांवर खेळत होते.
नायर, जाडेजा अपयशी
शुभमन गिलनंतर ऋषभ पंतनेही शतक ठोकले होते. त्यामुळे गिलच्या जागेवर आलेल्या करुण नायरकडूनही देशवासीयांना चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, कर्णधार बेन स्टोक्सने त्याला भोपळाही पह्डू दिला नाही. ओली पोपने एक्स्ट्रा कव्हरला हवेत सूर मारून केवळ चार चेंडू खेळलेल्या नायरचा अफलातून झेल टिपला. दरम्यान, ऋषभ पंतने 178 चेंडूंतील 134 धावांच्या खेळीत 12 चौकारांसह सहा षटकारांचा घणाघात केला. टंगने त्याला पायचीत पकडून इंग्लंडच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. मग त्याच्या जागी आलेल्या अष्टपैलू शार्दुल ठाकुर बाद झाल्यावर भारताचा डाव कोसळला.