
पुण्यात एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने महिला पोलिसाचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद कोंढरे हे पुण्यात भाजपचे शहर महामंत्री आहेत. सोमवारी एका कार्यक्रमानिमित्त भाजपचे कार्यकर्ते शनिवारवाड्याजवळ जमले होते. तेव्हा भाजप आमदार हेमंत रासने हे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना चहासाठी एका दुकानात घेऊन गेले. तेव्हा कोंढरे यांनी महिला पोलीस निरीक्षकाला दोन वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर या महिलेने आपल्या वरिष्ठांकडे याबाबत माहिती दिली. तेव्हा वरिष्ठांनी त्या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्यानंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली. तेव्हा पोलिसांनी कोंढरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दुसरीकडे कोंढवे यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. तसेच गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा दावा कोंढरे यांनी केला आहे.
आज अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली. प्रमोद विठ्ठल कोंढरे, जो भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता त्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला.
आताचं यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे जी यांच्याकडून माहीती घेतली असता संबंधित…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 25, 2025

































































