असं झालं तर… वकिलाकडून नोटीस मिळाली तर…

1) एखाद्या वकिलाने तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवली तर घाबरून जाण्याची गरज नाही. नोटीस कशामुळे पाठवली हे जाणून घ्या.

2) नोटीस पाठवणाऱ्याचे नाव, आरोप आणि नोटिसीला कधीपर्यंत उत्तर द्यायचे हे सर्व जाणून घ्या. यासाठी कायदेशीर सल्ला घ्या. वकिलाला भेटून नोटीस दाखवा.

3) तुमचा वकील तुम्हाला कायदेशीर परिस्थिती समजावून सांगतील व योग्य कायदेशीर सल्ला देतील. कायदेशीर नोटिसीला वेळेत उत्तर द्या.

4) समन्स मिळाल्यास न्यायालयासमोर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. हजर न राहिल्यास कोर्ट अवमानप्रकरणी दोषी ठरवून वॉरंट जारी करू शकते.

5) नोटीस म्हणजे कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्याची औपचारिक सूचना असते. त्यामुळे तुम्ही या प्रकरणात सहभागी असाल तरच पोलिसांच्या नोटीसवर स्वाक्षरी करा.