मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित शिवाजी पार्क दीपोत्सव 2025चे उद्घाटन संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आजची दिवाळी वेगळी आहे, विशेष आहे. मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या जीवनात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी हा दीपोत्सव मराठी ऐक्याचा दीपोत्सव होता, अशी प्रतिक्रीया दिली. तसेच यावेळी त्यांनी मतदार यादीतील घोटाळ्याबाबत बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधला.

काल उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच सांगितलं की आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. हे जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख, मनसे प्रमुख सांगतात ते पुन्हा एकत्र आले हे बोलणं योग्य नाही. काल जो दीपोत्सव झाला. तो गेली 14 वर्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून होतोय. ते मुंबईचं आकर्षण आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज व उद्धवजींनी मराठी जनतेला अभिवादन केलं. मराठी ऐक्याचा हा दीपोत्सव आहे असेही सांगितले. अशा असंख्य दिवाळी दीपोत्सव मराठी माणसाच्या जीवनात येवो ही मराठी माणसाची इच्छा आहे. काल जी आतिषबाजी झाली. तशी आतिषबाजी अनंतकाळापर्यंत मराठी माणसाच्या जीवनात राहो हिच आमची इच्छा आहे. यापुढे मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नात संघर्षात राज व उद्धव ठाकरे एकत्रितपणे काम करतील व मराठी माणसाला वैभव प्राप्त करून देतील हा या दीपोत्सवातून दिलेला संदेश आहे. यासाठी मराठी माणसाने शुभेच्छा दिल्या पाहिजेत”, असे संजय राऊत म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील युतीबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार हे देखील मराठी, महाराष्ट्राची अस्मिताच आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये काँग्रेसचे अनेक नेते होते. सध्या पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती मुंबईत निर्माण झाली आहे. आता देखील तसेच प्रयत्न सुरू आहेत. आता देखील मुंबई गिळण्यासाठी एका उद्योगपतीकडून महाराष्ट्रावर आक्रमण सुरू आहे. त्यामुळे ही लढाई ही प्रत्येक मराठी नेत्याची जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने पाळली पाहिजे. या लढाईत काँग्रेस राष्ट्रवादी कुठेही मागे राहणार नाही. या यादीत फक्त जागा वाटप हा मुद्दा नाही. तर मतदार यादीतीला जो घोटाळा आहे हा सुद्धा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी केला आहे. आम्ही त्या विरोधात एकत्र आलो. आम्ही आवाज उठवला, संधर्ष करायला तयार आहोत. रस्त्यावर उतरायला तयार आहोत. आमच्या पैकी एकाही पक्षाने एकत्र येण्यावरून नकारात्मक भूमिका केलेली नाही. काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात होते”, असे संजय राऊत म्हणाले.

आशिष शेलांवर बोलताना संजय राऊत यांनी त्यांना चांगलेच सुनावले. ”आशिष शेलांरांना सांगा की राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका. दोन्ही ठाकरेंचे रंग पक्के रंग आहेत. ठाकरेंचा रंग खरवडून काढण्याचा प्रयत्न कुणी करू नका. भाजपचा रंग राहिला आहे का? भाजपचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे, भाजपमध्ये आता 90 टक्के काँग्रेस आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग आहे. भाजपकडे स्वत:चं नेतृत्व आहे का? काल आलेल्या लोकांना हे भाजपचे नेते बोलतात. काल शिवाजीराव कर्डिले वारले. भाजपच्या नेत्यांचे निधन झाले असे बोलले गेले. आयुष्य काँग्रेस राष्ट्रवादीत गेलं. काही काळ शिवसेनेत होते. स्वत:चं काय आहे याचं. स्वत:ची पोरं जन्माला घाला. दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार तुम्ही. पाळणे तेवःढेच आहे, पोरं वाढत चालली आहे”, असे संजय राऊत म्हणाले.