
नशेबाजांचे चोचले पुरविण्यासाठी एमबीए ड्रग्स विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका ड्रग्ज पेडलरला धारावी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 29.10 ग्रॅम एमबीए हस्तगत करण्यात आले. ऑगस्टीन अॅग्नेलो फर्नांडिस (18) असे त्या पेडलरचे नाव आहे. ऑगस्टीन हा एमबीए विकण्याच्या प्रयत्नात असल्याची खबर एपीआय प्रमोद सालोळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह पीएमजीपी कॉलनी परिसरात सापळा रचून ऑगस्टीन याला उचलले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 29.10 ग्रॅम वजनाचे एमडी मिळून आले. हे ड्रग्ज त्याने कुठून आणले तसेच ते कोणाला विकण्यात येणार होते याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.