
कॅनडातील अॅबॉट्सफोर्ड येथे पंजाबमधील एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. दर्शन सिंग सहसी (वय 68) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पंजाबच्या लुधियाना जिह्यातील दोराहा गावचे रहिवासी होते. ते जगातील सर्वात मोठ्या कापड पुनर्वापर कंपन्यांपैकी एक असलेल्या कॅनम इंटरनॅशनलचे अध्यक्ष होते. सहसी कारमध्ये बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त केला आणि खबरदारी म्हणून जवळच्या तीन शाळा तात्पुरत्या बंद केल्या.




























































