
बाहेरगावी गेल्यानंतर घरात चोरी झाली तर घाबरून जाऊ नका. सर्वात आधी चोरी झाली आहे हे त्वरित स्थानिक पोलिसांना कळवा. त्यांना घटनेची तारीख, वेळ आणि ठिकाण सांगा.
पोलिसांना चोरी झालेल्या घटनेची सविस्तर माहिती देऊन तक्रार नोंदवा. यामध्ये चोरी झालेल्या वस्तूंची यादी आणि उपलब्ध पुरावे नमूद करायला विसरू नका.
तक्रारीनंतर चोरीचा पोलिसांकडून वेळेत अहवाल मिळवण्याचा प्रयत्न करा. विमा क्लेम किंवा इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांचा अहवाल आवश्यक असतो. त्यामुळे तो तत्काळ घ्या.
तुम्ही घराबाहेर असल्यानंतर चोरी झाल्यामुळे तपासासाठी पुरावा आवश्यक आहे. घरात सीसीटीव्ही पॅमेरे असल्यास त्याचे फुटेज तपासून पोलिसांना द्या. तपासासाठी आवश्यक आहे.
जर तुमच्याकडे घराचा विमा असेल, तर तुमच्या विमा पंपनीशी संपर्क साधा. घरातून मौल्यवान वस्तू दागिने, रोकड घरात ठेवण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी म्हणजेच बँकेतील लॉकरमध्ये ठेवा.


























































