
बीटरूट हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आरोग्य तज्ञ विशेषतः हिवाळ्याच्या काळात बीटरूट खाण्याची किंवा त्याचा रस पिण्याचे आपल्याला सांगतात. बीटाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. खासकरुन रिकाम्या पोटी आल्यासोबत बीटाचा रस पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. बीटरूटमध्ये नायट्रेटचे प्रमाण चांगले असते. आल्यासोबत बीटरूटचा रस मिसळून पिल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.
हिवाळ्यात साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, या टिप्स लक्षात ठेवा
आल्यामध्ये रोगाशी संबंधित जनुकांना रोखण्याची उपचारात्मक क्षमता आहे. मधुमेह, हृदयरोग आणि न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी ते प्रभावी आहे. आल्यासोबत बीटरूटचा रस पिल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच आपल्या त्वचेचा पोतही सुधारतो. केवळ इतकेच नाही तर, पचनसंस्था मजबूत होण्यास मदत मिळते. बीटरूटमधील अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवल्याने संक्रमण आणि रोग टाळण्यास मदत होते.
उत्तम आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोणते पाणी प्यायला हवे, वाचा
आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे आणि मॅंगनीज यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असतात. त्यात जिंजरॉल आणि शोगाओल सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी संयुगे देखील असतात, यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
बीटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते आतड्यांसाठी अधिक फायदेशीर मानले जाते. आल्याचे पाचन गुणधर्म पचन सुधारण्यासाठी फार महत्त्वाचे मानले जातात. यामुळे बद्धकोष्ठता टाळतात आणि पोट फुगणे कमी होते.
बीटरूटचा रस आणि आले एकत्र मिसळल्याने शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते. हे डिटॉक्स ड्रिंक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करून वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते.
बीटरूट आणि आले त्वचेसाठी फायदेशीर आहेत. अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले हे रस त्वचेला उजळवते, डाग कमी करते आणि केसांचे आरोग्यही सुधारते.



























































