पीव्हीसी आधार कार्ड घरपोच हवे असेल तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधार कार्ड हे प्रिंट, ई-आधार आणि पीव्हीसी कार्ड या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. बाजारात कुठल्याही दुकानातून पीव्हीसी कार्ड बनविल्यास ते अमान्य धरले जाते.

पीव्हीसी कार्ड हे डेबिट कार्डसारखे असते. ते कार्ड घरपोच देण्याची सुविधा ‘यूआयडीएआय’ने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केवळ 50 रुपयांचे शुल्क घेतले जाते.

त्यासाठी ‘यूआडीएआय’च्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. वेबसाईटवर आधार क्रमांक, कॅप्चा कोड भरून ‘सेंड ओटीपी’वर क्लिक करा.
ओटीपी सबमिट केल्यानंतर ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’वर क्लिक करावे लागेल. तेथे तुम्हाला तुमची माहिती दिसेल. त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.

या ठिकाणी पेमेंट करण्याचा पर्याय दिसेल. व्रेडिट किंवा डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे शुल्क भरा. त्यानंतर टपाल विभागाद्वारे पीव्हीसी कार्ड तुम्हाला घरपोच मिळेल.