
सीझन कुठलाही असो, सुंदर दिसण्यासाठी महिला नानाविध प्रयोग करत असतात. पार्लरमध्ये जाऊन फेशियल ब्लीच करणे हे अनेकदा शक्य होत नाही अशावेळी काही घरगुती उपायांनी सुद्धा आपण सुंदर दिसू शकतो. जसे शरीर आतून डिटॉक्स करता येते तेसेच त्वचा ही डिटॉक्स करता येते.
रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या
ICE FACIAL ने त्वचा डिटॉक्स होते. तसेच आइस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूजही फार मोठ्या प्रमाणात कमी होते. या फेशियलमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स नाहीसे होण्यास मदत होते.
आहारात या गरम मसाल्याचा समावेश करणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
हिवाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावल्याने आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलते. आईस फेशियल केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येते. शिवाय या फेशियमुळे त्वचेमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. आइस फेशियल त्वचेचे वृद्धत्व कमी करते. आईस फेशियल त्वचेवरील अतिरिक्त तेलही काढून टाकते. चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे तो त्वरित चमक देतो. थंड तापमान रक्ताभिसरण वाढवते, त्वचेच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवते. या वाढीव रक्त प्रवाहामुळे तुमचा चेहरा तेजस्वी चमक देतो, ज्यामुळे तो अधिक ताजा आणि निरोगी दिसतो. लग्न, पार्टी किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी तयार होत असाल तर, ही आईस फेशियल थेरपी तुमच्यासाठी नक्कीच वरदान ठरेल यात शंकाच नाही.
हिवाळ्यात चेहऱ्यावर बर्फ कसा लावावा?
एका मोठ्या भांड्यात पाण्यात बर्फ काढून घ्या आणि त्यात तुमचा चेहरा बुडवा.
20-30 सेकंदांनी तुमचा चेहरा बाहेर काढा.
जर तुम्हाला तुमचा चेहरा पाण्यात बुडवायचा नसेल, तर 2-3 बर्फाचे तुकडे सुती कापडात गुंडाळा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा.
आहारात या गरम मसाल्याचा समावेश करणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा


























































