
अधिवेशनाचा चौथा दिवस शेतकऱयांच्या प्रश्नावर चांगलाच गाजला. चर्चेच्या वेळेस मंत्र्यांची अनुपस्थिती, सोयाबीन आणि कापूस खरेदीच्या चर्चेला दिलेला अपुरा वेळ आणि सरकारकडून मिळालेले असमाधारकारक उत्तर यामुळे विरोधी बाकावरचे सदस्य संतप्त झाले. राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत; पण सरकारला शेतकऱयांच्या प्रश्नावर वेळ नाही असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान 6 लाखांहून अधिक शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असल्याचे सरकारच्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे.



























































