
दादरच्या माधववाडीत वसलेल्या साई द्वारका मंदिरात दोन दिवसांचे ‘श्री साई सच्चरित्राचे अखंड पारायण’ आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी 21 जानेवारी दुपारी या पारायणाचा शुभारंभ होणार असून 22 जानेवारी रोजी सकाळी समारोप होणार आहे. पारायणासाठी श्री साई सच्चरित्राच्या पाच पोथ्यांचे अखंड चक्री वाचन दिवसरात्र सुरू राहील. सर्व साईभक्तांनी या आध्यात्मिक उपक्रमात सहभागी होऊन साईचरित्र श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.


























































