विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामती येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक, सातारा जिह्यातील तरडगावचे सुपुत्र, मुंबई पोलीस विशेष सुरक्षा अधिकारी हेड कॉन्स्टेबल विदीप दिलीप जाधव यांच्यावर बुधवारी तरडगाव येथील पालखी तळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव यांचेही निधन झाले असल्याची बातमी गावात पसरताच तरडगाववर शोककळा पसरली. विदीप जाधव यांच्या निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.