
रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये अंतर राहते. तसेच मुख्य म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्यामुळे आपली पाचन प्रणाली निरोगी राहते. पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येपासून आराम मिळतो. आपल्याकडे आजही जेवणानंतर लगेच झोपू नये असं सांगितलं जातं. पूर्वीची जुनी-जाणती माणसं कायम म्हणायची, की शतपावली करा. काय असेल बरं या सर्वांमागचं कारण… जेवणानंतर शतपावली करण्याची प्रथा आता बंद पडल्यातच जमा आहे.
जेवणानंतर १०० पावले चालणे (शतपावली) ही एक प्राचीन आयुर्वेदिक पद्धत आहे जी पचन सुधारण्यास, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास, चयापचय वाढविण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते. रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, ताण कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
शतपावली करण्यामुळे काय फायदे होतात
शतपावली आतड्यांचे कार्य सुरळीत करते, ज्यामुळे पचन जलद होते आणि गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटफुगी कमी होते.
जेवणानंतर रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होण्यास प्रतिबंध होतो.
चालण्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत होते.
नियमित शतपावली रक्ताभिसरण सुधारते, ट्रायग्लिसराइड्स कमी करते आणि हृदयरोग टाळते.
शतपावली करण्यामुळे रात्रीची चांगली झोप येते.
अलीकडे आपल्या घरी जाण्या-येण्याच्या वेळाच बदलल्या आणि तिथेचे आपल्या सवयीही बदलल्या. म्हणूनच शतपावली म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. शतपावली म्हणजे जेवणानंतर काही काळ चालणे. त्यालाच शतपावली असे म्हणतात. म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर किमान शतपावली म्हणजे शंभर पावले चालणे हे खूपच गरजेचे आहे.
रात्रीच्या जेवणानंतर चालणे देखील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते कारण ते तुमच्या प्रणालीतील विष बाहेर टाकते. हे आपल्या अंतर्गत अवयवांसाठी चांगले कार्य करते. एक मजबूत प्रतिकारशक्ती फ्लू, सर्दी आणि इतर अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते.
शतपावली केल्याने शरीरातील एंडोर्फिन बाहेर पडून तणाव कमी होतो. हे आपल्याला चांगले वाटण्यासाठी आणि आपला मूड सुधारण्यासाठी कार्य करते.






























































