
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर अमेरिका आणि इस्रायलकडून होणाऱ्या सातत्याच्या हल्ल्यांवर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. द्वेषाची आग जगाला आंधळं बनवेल, अशा शब्दांत त्यांनी या हिंसेचा निषेध केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत प्रियंका गांधी यांनी जागतिक शांततेचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, “एका सार्वभौम राष्ट्राच्या नेतृत्वाची लक्ष्य करून केलेली हत्या आणि निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जाणे, हे अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे. यामागे कोणतेही राजकीय कारण दिले जात असले, तरी मानवी मूल्यांच्या दृष्टीने हे अमानवीय आहे.”
त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांची आठवण करून देत स्पष्ट केले की, सूड घेण्याच्या या आगीत कोणाचेही हित नाही. “जगाला आज युद्धाची नाही, तर शांततेची गरज आहे. जे नेते युद्धाचे निर्णय घेत आहेत, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की द्वेषाची ही आग केवळ विनाशाला आमंत्रण देईल,” असेही त्या म्हणाल्या आहेत.
The targetted assassination of the leadership of a sovereign nation by the so called leaders of the democratic world and the killing of multitudes of innocent people is despicable and deserves strong condemnation, no matter what the proclaimed reason for it is.
It is tragic that…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 1, 2026

























































