
इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असतानाच, आता देशातील राजकारणातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत केंद्र सरकारला या आंतरराष्ट्रीय विषयावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हणाले अखिलेश यादव?
अखिलेश यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एका देशाच्या खास व्यक्तींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांवरच जीवघेणे हल्ले होत आहेत. युद्धाच्या या परिस्थितीत हिंदुस्थानी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. सरकारने सांगावे की ते युद्धाच्या बाजूने आहेत की शांततेच्या? तसेच, एक तटस्थ देश म्हणून युद्ध थांबवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हिंदुस्थान कोणते राजनैतिक प्रयत्न करत आहे, हे देखील जनतेला सांगावे.”
अखिलेश यादव यांनी युद्धजन्य परिस्थितीत येणाऱ्या बातम्यांच्या विश्वासार्हतेवरही भाष्य केले. ते म्हणाले, “युद्धकाळातील बातम्या अनेकदा लष्करी रणनीतीचा भाग असतात. त्यामुळे सरकारने युद्धात मारल्या गेलेल्या लोकांशी संबंधित बातम्यांची स्वतः खात्री करावी आणि सत्य काय आहे ते देशासमोर ठेवावे. अशा बातम्यांची पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे.” ते पुढे म्हणाले की, “माणसासोबतच माणुसकीचाही बळी जाणे अत्यंत खेदजनक आहे. प्रत्येक देशाने या काळात जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.”
किसी देश के सबसे ख़ास से लेकर आम नागरिकों तक पर हो रहे जानलेवा हमलों व जंग के इन हालातों में हमारे देश की सरकार, इस अंतरराष्ट्रीय विषय पर अपना रुख़ साफ़ करे और बताए कि वो जंग के साथ है या अमन के और युद्ध को रोकने व शांति की बहाली के लिए एक तटस्थ देश होने के नाते क्या कूटनीतिक…
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 1, 2026

























































