
अखेर हिंदुस्थानने इतिहास बदलला अन् इतिहास घडवलासुद्धा. गेल्या वेळी अहमदाबादच्या याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर जगज्जेतेपद हाताच्या अंतरावरून निसटले होते. हिंदुस्थानने रविवारी ती जखम भरून काढली. नेहमीच वर्ल्ड कप जेतेपदाच्या सीमारेषेबाहेर असलेल्या न्यूझीलंडला याहीवेळी उचलून बाहेर फेकले आणि चषक राखण्याची व यजमान म्हणून जगज्जेते होण्याची किमया केली. एवढेच नव्हे तर टी-20 वर्ल्ड कप तिसऱयांदा जिंकत जगज्जेतेपदाचे थ्री चिअर्सही केले. टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या धुरंधरांनी केलेल्या स्फोटक फलंदाजीने रचलेल्या 256 धावांच्या एव्हरेस्टने न्यूझीलंडच्या पराभवाचा पाया रचला होता आणि हिंदुस्थानी गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव 159 धावांत संपवत 96 धावांनी विजय मिळवत जहाँ के हम धुरंधर असल्याचे दाखवून दिले.





























































