मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर पालिका अद्ययावत रुग्णालय उभारणार, गोल्फ क्लबला स्थानिकांचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या मुलुंड येथील डंपिंग ग्राऊंडवरील कचऱयावर प्रकिया केल्यानंतर पालिका या ठिकाणी अद्ययावत सुविधा असणारे उपनगरीय रुग्णालय सुरू करणार आहे. या ठिकाणी प्रस्तावित गोल्फ क्लबला स्थानिकांनी विरोध केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

मुंलुंडमध्ये 60 एकर जागेवर पालिकेचे डंपिंग ग्राऊंड आहे. स्थानिकांना या डंपिंग ग्राऊंडमुळे प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रोगराईचा धोका संभवतो. त्यामुळे स्थानिकांच्या तकारींवरून हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यानुसार या ठिकाणच्या कचऱयावर शास्त्राsक्त पद्धतीने प्रकिया केली जात आहे. पालिकेच्या माध्यमातून यासाठी मे. बायो मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. हे काम 78.63 टक्के पूर्ण झाले आहे. ही जागा मोकळी होत असताना या जागेच्या वापराबाबत अनेक नागरिकांकडून पालिकेला विनंती अर्ज प्राप्त झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली आहे.