
नंदुरबारमधील आदिवासी जमीन गैरआदिवासी व्यक्तीला हस्तांतरित करण्याचा गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात येईल. या हस्तांतरण व्यवहारात सहभागी असलेल्या सनदी अधिकाऱ्यांसह सर्व महसूल अधिकाऱ्यांची बदली करून त्यांची एका महिन्यात चौकशी केली जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.



























































