ड्रग्ज विकणारे आणि घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले, सरकारने कडक उपाययोजना कराव्या; सुनील प्रभू यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात ड्रग्ज विकणारे आणि त्याचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण जागोजागी वाढत असून, ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर सरकारने तात्काळ कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली. ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात विशेष उपचार केंद्रे सुरू करावीत, असेही त्यांनी यावेळी सुचवले.

विधानसभेत बोलताना सुनील प्रभू म्हणाले की, “ड्रग्ज विकणारे आणि पिणारे ह्यांचं प्रमाण जागोजागी वाढत आहे. ह्यावर कडक उपाययोजना होणे आवश्यक आहे. ड्रग्ज पिणाऱ्यांना ह्यापासून वंचित करण्यासाठी त्यांच्यावर उपचारार्थ जिल्हानिहाय केंद्र सुरु करणे गरजेचे आहे.”

ते म्हणाले, “मालाड पश्चिम येथील साईनाथ महिला संघटना समितीच्या पोलीस पत्नींनी भेटून पोलीस वसाहत दुरुस्तीसाठी पीडब्ल्यूडीकडे निधीची मागणी केली. ती अजून देण्यात आलेली नाही. बीडीडीप्रमाणेच त्यांनाही घरे द्यावीत, अशी त्यांची मागणी आहे. त्यानुसार कार्यवाही करावी.”