
‘सहलीला जायाचं’ हे गाण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप मोठय़ा प्रमाणात ट्रेंडिंग होतंय. या गाण्यावर अनेक इन्फ्ल्यूएन्सर्ससह कलाकारदेखील थिरकताना दिसतायत. अशातच सहलीला निघालेल्या एका ग्रुपचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत आजींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अगदी हुबेहूब डान्स स्टेप करत या महिलांनी सगळ्यांचं मन जिंकलंय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @samartha_tours4140 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला लाखो ह्यूज आहेत.



























































