बनावट नोटा बनवण्यासाठी चीनहून मागवले कागद, अहमदाबादमध्ये सात जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

500 रुपयांच्या नकली नोटा बनवण्यासाठी थेट चीनहून हाय क्वॉलिटीचे कागद मागवणाऱया आणि बनावट नोटा बनवणाऱया टोळीला गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. 2.38 कोटी रुपयांच्या फेक नोटांसह एकूण सात जणांना अहमदाबाद क्राइम ब्रँचने अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. 500 रुपयांच्या नोटा बनवण्यासाठी आरोपी चॅटजीपीटी एआय आणि चीनहून मागवलेल्या सिक्योरिटी थ्रेड पेपरचा वापर करत होते.

आरोपींनी चीनहून हाय क्वॉलिटीचे कागद आणि अन्य सामग्री मागवली होती. 500 रुपयांच्या नोटा हुबेहुब वाटाव्यात यासाठी आरोपींनी औद्योगिक ग्रेड प्रिंटरला कॉन्फिगर करण्यासाठी चॅटजीपीटी आणि अन्य एआय टूलचा वापर केला होता, असे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या सातही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये मुकेश थुम्मर याची मुख्य भूमिका होती. पोलिसांनी आरोपींकडून प्रिटिंग मशीनसुद्धा जप्त केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये आणखी कोणाकोणाचा संबंध आहे. याआधी या टोळक्याने बनावट नोटा चलनात आणल्या का, या सर्व प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.