
आवडती भाजी करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने गर्भवती पत्नीची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सुनील असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीला पालकची भाजी बनवायला सांगितले. मात्र आधीच जेवण तयार असल्याने पत्नीने पालकची भाजी बनवण्यास नकार दिला. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा विकोपाला गेला आणि पतीने पत्नीला शेतात ओढत नेत कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.























































