
गुगलने आपल्या जीमेल यूजर्सला एक मोठी भेट दिली आहे. गेल्या 22 वर्षांपासून प्रतीक्षा असलेले अपडेट अखेर गुगलने आणले आहे. या नव्या अपडेटमुळे आता यूजर्सला साइन आधी आपल्या जीमेलचा यूजरनेम बदलता येईल. 1 एप्रिल 2004 पासून गुगलने जीमेल सर्विस सुरू केली होती. सर्विस सुरू झाल्यानंतर दोन दशकाहून अधिक काळानंतर हा बदल करण्यात आला आहे. गुगलने जीमेलमध्ये यूजरनेम बदलण्याचे फिचर सध्या यूएसमध्ये राहणाऱया युजर्ससाठी उपलब्ध केले आहे. अन्य देशांत हा बदल कधीपर्यंत होईल, याविषयी अद्याप कोणतीही माहिती सांगण्यात आली नाही.
जीमेलला 22 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुगलने हे अपडेट जारी केले आहे. अॅड्रेस बदलल्यानंतर अकाऊंट डेटा, ज्यात पह्टो, मेसेज आणि ई-मेलवर कोणताही परिणाम होणार नाही. एकदा जीमेल अॅड्रेस बदलल्यानंतर 12 महिन्यांपर्यंत दुसरा जीमेल अॅड्रेस बदलता येणार नाही, असेही गुगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



























































