
इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने बुधवारी आपल्या नागरिकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी केली असून, युद्धग्रस्त देशातून ‘त्वरित बाहेर पडण्याचा’ (expeditiously exit) ‘महत्त्वाचा सल्ला’ दिला आहे.
इराणमधील हिंदुस्थानी दूतावासाने ‘X’ वरील एका पोस्टद्वारे हिंदुस्थानी नागरिकांना सुचवलेल्या मार्गांचा वापर करून देश सोडण्यास सांगितले आहे.
⚠️ Advisory as on 08 April 2026. pic.twitter.com/pusFQIAKKI
— India in Iran (@India_in_Iran) April 8, 2026
‘दूतावासाशी पूर्व सल्लामसलत आणि समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही आंतरराष्ट्रीय भू-सीमेकडे जाण्याचा प्रयत्न करू नये, हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे,’ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दूतावासाने आपले आपत्कालीन संपर्क क्रमांक – +९८९१२८१०९११५; +९८९१२८१०९१०९; +९८९१२८१०९१०२; +९८९९३२१७९३५९ आणि ई-मेल आयडी – [email protected] देखील जाहीर केला आहे.



























































