कोपर रेल्वे स्थानकाजवळ गर्दीने घेतला तरुणाचा बळी; काकांच्या अंत्यविधीला निघालेल्या तेजसवर काळाची झडप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काकांच्या अंत्यविधीसाठी नालासोपारा येथे जात असलेल्या तेजस पवार (३०) या तरुणाचा कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान गर्दीने बळी घेतला आहे. तेजसने आपल्या पत्नीला महिलांच्या डब्यात सुरक्षित बसवले. त्यानंतर तो लोकलच्या सर्वसाधारण डब्यात चढला. या डब्यात असलेल्या गर्दीमुळे तो लोकलमधून बाहेर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचार सुरू असताना तेजसचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे लोकलमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दिवा परिसरात राहणारा तेजस पवार हा मूळचा देवगड येथील होता. नालासोपारा येथे वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या काकांचे अचाकन निधन झाले. – त्यांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी तेजस हा पत्नीसमवेत गुरुवारी सकाळी दिवा रेल्वे स्टेशनवर पोहोचला. दिव्यात गदीं जास्त असल्यामुळे तो मागे कोपर येथे लोकल पकडण्यासाठी गेला. तिथे त्याने पत्नीला लोकलमध्ये – महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरीत्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. डब्यात गदीं असल्यामुळे त्याला दरवाजातच उभे बराहावे लागले. लोकल काही अंतर पुढे गेल्यानंतर गर्दीचा धक्का बसून तो लोकलच्या डब्यातून बाहेर फेकला गेला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

देवगडवर शोककळा
तेजस पवार याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्यानंतर हे दाम्पत्य दिवा येथील आपल्या घरी राहण्यासाठी आले होते. त्याचा ठाणे रेल्वे स्थानकात अपघाती मृत्यू झाल्यानंतर देवगडमधील त्याच्या नातेवाईकांची ठाण्याच्या दिशेने रिघ लागली. रुग्णालयात मोठी गर्दी झाली. तेजसच्या मृत्यूमुळे देवगड परिसरातील त्यांच्या मूळगावावर शोककळा पसरली आहे.